जळगाव – अहिर सुवर्णकार महिला मंडळच्या माजी अध्यक्षा सौ. वैशाली विसपुते यांच्या अध्यक्षतेखाली सुवर्णकार महिलांचा हळदी कुंकूवाचा कार्यक्रम, नवीन पदाधिकारी व कार्यकारणी जाहीर करण्यात आली. गेल्या ३५ वर्षांपासून अखंडित समाजकार्य अहिर सुवर्णकार महिला मंडळ जळगाव करीत आले आहे.
माजी अध्यक्षा सौ. वैशाली विसपुते यांनी नूतन अध्यक्षा सौ. रंजनताई विजय वानखेडे यांना पदभार सोपविला. यावेळी महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम देखील झाला. नुतन अध्यक्षा सौ. रंजनाताई विजय वानखेडे यांनी महाराष्ट्र सुवर्णकार सेना जळगाव जिल्हा जळगाव यांचा प्रकर्षाने नामोल्लेख करीत म्हटले की, या संघटनेने आम्हाला आजवर खूप बळ दिले आहे व त्या बळावरच महिला मंडळ निरंतर समाजकार्य करीत आहे. महिलांचा वैचारिक व आर्थिक स्तर वाढवावा यासाठी सदैव प्रयत्न करून भक्कम महिलांची अखंड साखळी तयार करीतच राहीन असे मत सौ. वानखेडे यांनी व्यक्त केले.
प्रसंगी माजी अध्यक्षा सौ. वैशाली ताई यांनी महिलांना मार्गदर्शन केले. एकत्रित व निरंतर समाजकार्य करीत राहावे असे आवाहन त्यांनी केले.
कार्यकारी मंडळ पुढील प्रमाणे-
अध्यक्षा- सौ. रंजनताई विजय वानखेडे.
उपाध्यक्षा- सौ. संगीता संजय विसपुते.
सचिव – सौ. राजश्री रविराज पगार.
कार्याध्यक्ष – सौ. विजया सतीश जगताप.
खजिनदार- सौ. सुवर्णा नंदूशेठ बागुल.
सदस्य- सौ.प्रमिला विलास बाविस्कर.
सदस्य- सौ.रुपाली संजय भामरे.
सदस्य- सौ. मनीषा अविनाश रणधीर.
सदस्य- सौ. अनिता अश्विन सोनार.
सदस्य- सौ. सविता विजय मोरे.
सदस्य- सौ. सारिता प्रशांत विसपुते.
सदस्य- सौ. कांचन अमोल विसपुते.
सदस्य- सौ. लताताई अंबादास मोरे.
सदस्य- सौ. सारिता भगवान दुसाने.
सदस्य- सौ. स्वाती गोकुळ सोनार.
सदस्य- सौ. आशा नारायण अहिरराव.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ राजश्री पगार व आभार सौ शुभांगी वानखेडे यांनी केले कार्यक्रम प्रसंगी असंख्य महिला भगिनी यांची उपस्थिती लाभली.