जळगाव प्रतिनिधी – आम आदमी पार्टीचे संयाेजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा जळगाव शहरासह जिल्हाभरातील पदाधिकाऱ्यांनी निषेध केला आहे.
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देऊन या घटनेचा निषेध नाेंदवला.
डाॅ. बाबासाहेब आबेडकर यांच्या स्मारकाचे दर्शन घेऊन संविधानिक मार्गाने निषेध नाेंदवा. महानगर कार्याध्यक्ष याेगेश हिवरकर यांच्या नेतृत्वात निवेदन दिले. या वेळी महानगर सचिव चंदन पाटील, अनिल वाघ, याेगेश भाेई, लक्ष्मण काेल्हे, जिल्हा सचिव रईस खान, सिद्धार्थ साेनवणे, हेमंत साेनवणे, दुर्गेश निंबाळकर आणि पदाधिकारी उपस्थित हाेते.