जळगाव – स्वर्गीय हिरेशदादा कदम यांची ५१ वी जयंती सागर पार्क जळगाव येथे आज साजरी करण्यात आली. या जयंती निमीत्त जळगाव शहरातील खेळाडू आणि नागरिकांसाठी सागर पार्क येथे सिमेंटची १० बाके देऊन बैठकची व्यवस्था करण्यात आली.
गेल्या फेब्रुवारी महिन्यात स्वर्गीय हिरेश कदम यांचे दुःखद निधन झाले होते तर आज त्यांची ५१ वी जयंती होती यानिमित्त मराठा प्रीमियर लीग तसेच जळगाव शहरातील ईतर क्रिकेट संघटनाच्या पदधिकार्यांनी एकत्र येऊन पुढाकार घेतला आणि आज स्वर्गीय हिरेश कदम जयंतीचे निमित्त साधून सागर पार्क जळगाव येथे हा कार्यक्रम घेण्यात आला.जळगाव शहरातील मराठा प्रीमियर लीग , जळगाव सिव्हिल इंजिनियर्स ,सागर पार्क क्रिकेट क्लब , जल फाउंडेशन या क्रिकेट संघटनांनी मदत करून हि १० सिमेंटची बाके उपलब्ध करून दिली तसेच स्वर्गीय हिरेश कदम यांच्या बाकावरील नावासमोर मेणबत्ती पेटवून तसेच पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी वरील सर्व संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते


