जळगाव, प्रतिनिधी । जळगाव येथील इकरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार यांना त्यांचे शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, कार्याची दखल घेत महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटना सावदा यांच्यातर्फे ‘सेंट ऑफ एज्युकेशन पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले.
सावदा येथे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात डॉ. अब्दुल करीम सालार यांना ‘सेंट ऑफ एज्युकेशन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी असगर सेठ, कालू मिस्त्री ,नईमोद्दिन सर , मोइनोद्दिन सर, सलीम खान सर, गौस खान सर, डॉ. वकार शेख सर, नफीस जनाब, अजमल खान, आणि महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.