जळगाव – राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील यांच्या राजीनामा ई-मेल द्वारे प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याकडे पाठविण्यात आला.
राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षपदावर कल्पना पाटील यांनी सुमारे तीन वर्षेपेक्षा जास्त काम केले असल्याने आता नवीन तरुण उत्साही महिलेस यापुढे संधी देण्यात यावी असा ई-मेल राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याकडे पाठविण्यात आला.
अनेक दिवसापासून त्या राजीनामा देणार असल्याची चर्चा होती त्याला आज अल्पविराम लागला .तसेच पक्ष सत्तेत नसतांना देखील त्यांनी अनेक आंदोलने, मोर्चे काढले. महिला संघटना बळकट करण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केल्याचे राजीनाम्यात उल्लेख केल्याचे दिसून आले.


