जळगाव- तालुक्यातील वावडदा येथे कोरोनाबाबत सर्वांनी नियमाचे पालन करावे. अन्यथा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा ग्रामपंचायत प्रशासनामार्फत अधिकारी, कर्मचारी, पदाधिकाऱ्यांनी दिला.
वावडदा हे गाव चौफुलीवर असून येथे परिसरातील मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे विशेषत: बसस्थानकावर नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. सध्या कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. पुन्हा रुग्ण संख्या वाढत असल्याने विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता सर्वांनी मास्क वापरावे. सोशल डिस्टन्स ठेवण्यात यावे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये. विनाकारण रस्त्यावर फिरू नये. सुरक्षेच्या दु्ष्टीने घरात बसावे, असे आवाहन
ग्रामपंचायतमार्फत सरपंच राजेश वाडेकर, उपसरपंच कमलाकर पाटील, सदस्य राजू मराठे, पोलिसपाटील मकुंदा पाटील, ग्रामसेवक जी. आर. मोची, लिपिक मुरलीधर जाधव यांनी केले. ग्रामपंचायतीच्या या पथकाने वावडदा चौफुलीवर पाहणी केली. त्यांनी दुकानदार, ग्राहक, वाहनचालक, प्रवाशी, ग्रामस्थ आदींना कोरोनाबाबत माहिती दिली. मास न लावल्यास व नियमांचे पालन न केल्यास उद्यापासून दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.