पाचोरा प्रतिनिधी । शहरातील सर्वत्र ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत पार पडली. जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे मिरवणुक काढण्यास मनाई असल्याने भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांचे सह १९ जणांविरुद्ध पाचोरा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्याचे गृहविभाग यांचेकडील क्रं. आर. एल. पी. ०२२१ / प्र. क्रं. ५३ / वि.शा. ०१ ब दि. ११ फेब्रुवारी २०२१ अन्वये व जिल्हाधिकारी यांचेकडील आदेश क्रं. दंडप्र. ०१ / कावि/ ५७१ / २०२१ दि. १७ फेब्रुवारी २०२१ अन्वये कोणत्याही प्रकारच्या मिरवणुका न काढणे बाबत आदेश पारित असतांना गर्दी जमवुन शहरात मिरवणुक काढत असतांना येथील भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, रामा मोहन जठार, शुभम गायकवाड, रमेश मुरलीधर वाणी, राहुल अंकुश गायकवाड, विशाल मोरे (लॅब असिस्टंट), सुमित निकम (काॅन्ट्रक्टर), लखन काळे, विजय रामकृष्ण यादव, अतुल लिगाडे, गोलु चौधरी, अतुल भोसले, कपिल पाटील, पंकज पाटील, दादु पाटील, सोनु नागणे, दिपक माने, शहाजी बावचे व मयुर (पुर्ण नाव माहित नाही) सर्व रा. पाचोरा यांचे विरुद्ध पाचोरा पोलिसात जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असुन घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रकाश संतोष पाटील हे करीत आहे.