जळगाव प्रतिनिधी । शहरातील एचडीएफसी बँकेतून ६० वर्षीय वृद्धाच्या हातातून पैश्यांची बॅग चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्याला नागरिकांनी पकडून चोप दिल्याची घटना दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास डीएसपी चौकात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध रामानंद नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगावातील शनिपेठ परिसरातील रहिवाशी धनराज प्रेमराज पुरोहित (वय-६०) हे कामाच्या निमित्ताने काव्यरत्नावली चौकातील एचडीएफसी बँकेत दुपारी 12.30 वाजता आले होते. बँकेतून दोन लाख रूपयांची रोकड काढली व पिशवीत रक्कम ठेवून पायी घरी जाण्यासाठी निघाले. दुपारच्या सुमारास मागुन चोरटा दुचाकीने मागून येवून पैश्यांची पिशवी हिसकविण्याचा प्रयत्न केला असता प्रसंगावधानाने धनराज पुरोहित यांनी हातातील पिशवी सोडली नाही. त्यामुळे दुचाकीवरील चोरटा हा खाली पडला.
पुरोहित यांनी आरडाओरड केली
पुरोहित यांनी आरडाओरड केली असता परिसरातील नागरीकांनी धाव घेवून चोरट्याला पकडले व बेदम मारहाण केली. घटनेची माहिती मिळतात रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी दाखल झाली. चोरटा राहूल उत्तम चौधरी (वय-२६) रा. मांडकी ता. भडगाव जि.जळगाव असे तरूणाचे नाव आहे. या तरूणाकडे (एमएच १९ सीक्यू ५००७) क्रमांकाची दुचाकी आहे. दुचाकीची नंबरप्लेट उलटी करून कोरी नंबरे प्लेट लावून चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे.
रामानंद नगर पोलीस घटनास्थळी दाखल
रामानंद नगर पोलीस स्तनकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी, दिपक बिरारी, पो.कॉ.रवी पाटील, रविंद्र चौधरी, हरीष डोईफोडे, अजय सपकाळे, संजय तडवी, किशोर पाटील, महेश पवार यांनी कारवाई करत चोरटा राहूल चौधरी याला उपचारार्थ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले. धनराज पुरोहित यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.


