जळगाव प्रतिनिधी । शहरातील शिवाजी नगर भागातील सार्वजनिक शौचालयाजवळ दोन जणांना पैसे न दिल्याच्या कारणावरून लोखंडी पट्टीने बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना १९ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवाजी नगर परिसरातील दूध फेडरेशनच्या मागे सत्यम पार्क येथे संजय माधव गवांदे यांचे टेलर आहे. त्याचे शिवाजीनगर हुडको भागात सिंधुदुर्ग या बिल्डींगमध्ये अमरसिंग मंगलसिंग पाटील यांच्या घर नं ३८ याठिकाणी काम चालते. याठिकाणी गवांदे यांच्योसाबत काम करणारे कारागिर अर्शद जमालोद्दीन अली, दानिश जावेद, परवेज, अन्वर व अयाज हे सुध्दा वास्तव्यास आहेत. १९ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास गजाजन बाविस्कर हा शिवाजीनगर हुडको येथे आला. त्याने याठिकाणी अर्शद अली यांच्यासह कारागिरांना पैशांची मागणी पैसे दिले नाही, तर याठिकाणी काम करु देणार नाही अशी धमकी देवून निघून गेला. ही बाब अर्शद अली यांनी गवांदे कळविली.
त्यानुसार गवांदे आले त्यांनी गजाजन बाविस्कर याच्या घरी जावून शोध घेतला मात्र मिळून आला नाही. पुन्हा पायी येत असतांना शिवाजीनगरातील महापालिकेच्या सार्वजनिक शौचालय येथे गजाजन बाविस्कर हा त्याच्या दोन साथीदारासोबत बसलेला होता. गवांदे यांना पाहताच बाविस्कर याने कपाटावर दगड मारुन फेकला. तर इतर दोघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यानंतर बाविस्कर याने पुन्हा त्याच्या हातातील लोखंडी पट्टी डाव्या हातावर मारली. बोटाला गंभीर दुखापत केली.
गंवादे यांचा मुलगा जयेश गवांदे हा घटनास्थळी
घटनेची माहिती मिळाल्यावर गंवादे यांचा मुलगा जयेश गवांदे हा घटनास्थळी आला. त्यालाही बाविस्कर तसेच त्याच्या दोघांनी लोखंडी पट्टीने मारहाण करुन उजव्या हाताला दुखापत केली. यानंतर जखमी गवांदे यांना जिल्हा रुग्णालयात तर मुलगा जयेश याला साकेगाव येथील डॉ उल्हास पाटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात गजानन विलास बाविस्कर याच्यासह दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.