मुंबई, वृत्तसंस्था – गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ होते आहे. सलग 12 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याने सर्वसामान्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. आजही मुंबईत पेट्रोलमध्ये 37 पैशांची वाढ झाली आहे.
तर डीझेलही 39 पैशांनी वधारले आहे. मुंबईत आज पेट्रोल 96.94 रुपये आहे तर डीझेल 88.01 रुपये झाले आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डीझेलचे दर काही प्रमाणात नियंत्रणात आणून दिलासा द्यावा अशी मागणी सर्वसामान्यांकडून होते आहे.
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डीझेलचे दर बदलतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड आयओसीएलच्या वेबसाइटरवर मिळेल. देशातील काही शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाइटवर आहेत. इंधनाच्या किमती शहरांनुसार वेगवेगळ्या असू शकतात.