जळगाव – शहरातील टायगर ग्रुपतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उदघाटन भारत देशाच्या सेवेसाठी सर्वस्व पणाला लावणारे भारतीय सैन्यदलामधील सेवानिवृत्त किरण महाजन व दिल्ली येथील जवान म्हणून कार्यरत असलेले मयूर वाघमारे यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांना माल्यार्पण करून व त्यांच्या हस्ते रक्तदान शिबिराला सुरुवात केली.
रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहाने महिला व पुरुषांनी मिळून 201 बॅग रक्तदान करून शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. जळगाव जिल्हा राष्ट्रीय हिंदू सुरक्षा सेना व महाराष्ट्र राज्य टायगर ग्रुप अध्यक्ष पै. तानाजी जाधव, उत्तर महाराष्ट्राची बुलंद आवाज पै. सागर कांबळे, टायगर ग्रुप खानदेश विभाग अध्यक्ष पै. ऋषिकेश भंडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली खान्देश टायगर ग्रुप यांचा सहभाग शिबिराला मोठ्या प्रमाणात लाभला.
रक्तदान शिबिर हे रेड प्लस ब्लड बँक यांच्या सौजन्याने आयोजित केले होते. यावेळी रक्तदान शिबिरात डॉ. भरत गायकवाड, डॉ. एम. देशपांडे, डॉ. एम पटेल, शिबीराचे आयोजक विवेक महाजन, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश सपकाळ, लखन वालेचा, राकेश महाजन, टायगर ग्रुपचे जळगाव जिल्हा सामाजिक कार्यकर्ते गौरव उमप, सोपान मानकर, आनंद घुगे, दिपक गायकवाड, किरण चौधरी, मनोज बाविस्कर, कुणाल बारी, जितू निंबाळकर, रवींद्र पाटील, विशाल काकडे, राष्ट्रीय हिंदू सुरक्षा सेनेचे जिल्हाध्यक्ष मयूर बारी, प्रदीप सोनार, हेमंत वडनेरे आदी उपस्थित होते. तसेच रक्तदान करणार्या प्रत्येक रक्तदात्यांना सारा हॉस्पिटलयांच्याकडून लखन वालेचा, प्रकाश सपकाळ , विवेक महाजन यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांचे टी-शर्ट वाटप करण्यात आले.