भुसावळ प्रतिनिधी । शहरातील बद्री प्लॉट परिसरातील अवैध गुटखा विक्री करणार्या दुकानदाराला बाजारपेठ पोलिसांनी जेरबंद करण्यात आले. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात गुन्हा करण्यात आला आहे.
भुसावळ शहरातील बद्री प्लॉट भागात दुकानदार विनोद भारंबे याच्या दुकानात गुटखा विक्री होत असल्याची गुप्त माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, सहायक अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मंगेश गोटला, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, प्रशांत सोनार, ईश्वर भालेराव यांच्या पथकाने त्याच्या दुकानावर छापा टाकला.
यामध्ये पोलिसांनी पकडलेला माल २२ हजार ३१५ रूपये किमतीचा आहे. गुटखा जप्त करत विनोद भारंबेला अटक केली. पोलिस कर्मचारी प्रशांत सोनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गोटला करीत आहेत.