Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

लस घेतल्यानंतरही मुंबईतील दोन पोलिस कोरोनाबाधित

by Divya Jalgaon Team
February 20, 2021
in आरोग्य, राज्य
0
लस घेतल्यानंतरही मुंबईतील दोन पोलिस कोरोनाबाधित

मुंबई, वृत्तसंस्था : कोरोनाची लस घेतल्यानंतरही पुन्हा कोरोनाची लागण होत असल्याचं उघड झालं आहे. पुण्यातील एका नर्सला कोरोनाची लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं होतं. ही घटना ताजी असतानाच आता घाटकोपर पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांनाही कोरोनाची लस घेतल्यानंतर लागण झाल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.

हे दोन्ही पोलीस कॉन्स्टेबल घाटकोपर पोलीस ठाण्यातील आहेत. त्यांनी कोरोनाचा पहिला डोस घेतला होता. मात्र, त्यानंतरही त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे जाणवत होते. यापैकी एका पोलिसाला चार ते पाच दिवसांपासून करोनासदृष्य लक्षणे दिसत होती. त्यामुळे 18 फेब्रुवारी रोजी त्यांची कोरोनाची चाचणी केली होती. यावेळी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे घाटकोपर पोलीस ठाण्याचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर या दोन्ही पोलिसांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे घाटकोपर पोलिसांनी सांगितले.

या आधी लस टोचल्यानंतरही कोरोना पुण्यात ससून रुग्णालयातील एका नर्सलाही पुन्हा कोरोना झाला आहे. विशेष म्हणजे कोरोनाची लस घेतल्यानंतरही या नर्सला कोरोनाची लागण झाली आहे. नर्सला कोरोनाची लस टोचल्यानंतरही तिला कोरोनाची लागण झाली असेल तर त्याने घाबरून जाण्याची गरज नाही. या नर्सने आतापर्यंत कोरोनाचा पहिलाच डोस घेतला आहे. दुसरा डोस बाकी आहे, असं ससूनचे डीन मुरलीधर तांबे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. काही दिवसांपूर्वी नाशिकच्या सिव्हिल रुग्णालयातही एका फार्मसिस्टला कोरोनाचं इंजेक्शन देण्यात आलं होतं. पण दुसरा डोस घेण्यापूर्वीच तो एका कोरोना रुग्णाच्या संपर्कात आला होता. त्यानंतर त्याची टेस्ट केली असता त्याला कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं होतं. तर अमरावतीतही जिल्हा रुग्णालयातील 12 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण झाली होती. त्यावर सिव्हिल सर्जन निकम यांनी या आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याचा आणि कोरोना लसीचा काही संबंध नसल्याचं सांगितलं. कोरोना होऊ द्यायचा नसेल तर दोन डोसचा कोर्स पूर्ण करणं गरजेचं आहे, असं निकम म्हणाले.

राज्याचे जलसंपदा व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची दुसऱ्यांदा लागण झाली आहे. तर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनाही कोरोना झाला आहे. त्यांना यापूर्वी कोरोनाची लक्ष जाणवली होती. त्यावर त्यांनी उपचारही घेतले होते. तसेच नागपूरमध्ये पाच डॉक्टरांना उपचारानंतर पुन्हा कोरोना झाला आहे.

मुंबईत काल 823 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. चेंबूर येथे कोरोनाचे रुग्ण अधिक असल्याने या ठिकाणच्या चार इमारती सील करण्यात आल्या आहेत. 14 दिवसांसाठी या इमारती सील करण्यात आल्या आहेत. या इमारतीत राहणाऱ्या लोकांना घरातूनच काम करावं लागत असून जेवणही ऑनलाईन मागवावं लागत आहे. चेंबूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे या परिसरात कडक निर्बंध घालण्यात आले असून परिसरात शुकशुकाट पसरला आहे.

Share post
Tags: CoronaMarathi NewsMumbaiPoliceVaccineलस घेतल्यानंतरही मुंबईतील दोन पोलिस कोरोनाबाधित
Previous Post

मोठा निर्णय! आता बँक खात्यातून काढता येणार फक्त 1000 रुपये

Next Post

अवैध गुटखा विक्री करणार्‍या दुकानदाराला पोलिसांनी केले जेरबंद

Next Post
अवैध गुटखा विक्री करणार्‍या दुकानदाराला पोलिसांनी केले जेरबंद

अवैध गुटखा विक्री करणार्‍या दुकानदाराला पोलिसांनी केले जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group