जळगाव प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शहरातील अनाथाश्रम व बेघर असलेल्यांना सर्व समाजाचे युवा कार्यकर्त्यांनी फळ वाटप करून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
शहरातील जमील शेख, जळगाव ग्रामीण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मनोज डिगंबर पाटील, तुषार जाधव, गायत्री सोनवणे, सागर साळुंखे, उमेश मिस्तरी, भैय्या पाटील (धुळे) यांच्या सहकार्याने शिंधी कॉलनीतील संतमेळा येथून फळवाटपास सुरूवात करण्यात आली.
त्यानंतर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव रेल्वे स्टेशन आणि केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे उभारण्यात आलेल्या बेघरांसाठीच्या निवासस्थानी फळवाटप करण्यात आले. दिवसभरातून त्यांनी सुमारे १५० ते २०० जणांना फळांचे वाटप केले. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाने शिवजयंती अनोख्या पध्दतीने साजरी करून शिवरायांना अभिवादन केले आहे.