जळगाव – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ. जयदेव गायकवाड, प्रदेश उपाध्यक्ष पंडीत कांबळे यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी यांनी सांगवी ता.पाचोरा जि.जळगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते विनोद सुरेश कांबळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग जळगाव जिल्हा संघटकपदी निवड केली असून त्यांना नियुक्ती पत्र देतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव महानगरचे माजी जिल्हाध्यक्ष परेश कोल्हे, कार्यालय प्रमुख संजय चव्हाण, गणेश निंबाळकर, छोटू सरकार यांच्या उपस्थित होते.