जळगाव, प्रतिनिधी । जळगाव जिल्हा व महानगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने प्रतिमेस पुष्पमाला माजी आमदार मनीष जैन याच्या शुभहस्ते माला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करतांना महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील, जिल्ह्य समन्वयक विकास पवार, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, युवा अध्यक्ष रविन्द्र नाना पाटील, जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील , सुदाम पाटिल, माजी नगरसेवक डॉ. रिजवान खटीक, नईम खटीक, राजेंद्र भंगाळे, पराग पाटील, संजय चौहान, उज्वला शिंदे, कमल पाटील, जुबेदा तडवी आदी उपस्थित होते.