जळगाव – आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व राष्ट्रीय कला मंच आयोजित पोवाडा व गीत सादरीकरण कार्यक्रम शिवतीर्थ चौकात संपन्न झाला.
सकाळी 10 वाजता अभाविप कार्यालयापासून पदयात्रेचे सुरुवात झाली व शिवतीर्थ चौकात पोवाडा, शिवगर्जना व शिवगीत सादर करण्यात आले व त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून शेवट करण्यात आला. पोवाडा सादर करण्यात महाराजांच्या भूमिकेत रुपेश भाकरे, जिजाऊ – वर्षा सैंदाणे, अफजलखान-अक्षय बोरखडे, जिवा महाला -निखिल चौधरी, शाहीर- नितेश चौधरी यांनी जिवंत देखावा सादर केला. तसेच शिवगीत प्रांजल बाबर यांनी सादर केले व निखिल बिरारी यांनी शिवगर्जना केली.
आजच्या शिव जयंतीच्या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून अभाविपचे प्रदेश संघटन मंत्री श्री.अभिजीत पाटील, प्रदेश मंत्री सिद्धेश्वर लटपटे यांची उपस्थिती होती. त्याचप्रमाणे महानगर मंत्री आदेश पाटील, रितेश चौधरी, आदित्य नायर, रितेश महाजन, चंद्रकांत पाटील,नितेश चौधरी, सोहम पाटील, प्रज्वल पाटील, हर्षल तांबट ,पवन भोई ,चैतन्य माहुलकर, जितेश चौधरी, चैतन्य बोरसे, मयूर अल्कारी, चिराग तायडे, गौरवी चौधरी, भूमिका कानडे ,हर्षलता पाटील ,हिमानी महाजन, हेमांगी पाटील, दिपजा गायकवाड ,सृष्टी पाटील, हिमानी वाडीकर, विद्या कोळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.