चांदसर – छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९७ व्या जयंती निमित्त चांदसर गावात स्वराज्य ग्रुप, तसेच ग्रामपंचायतिच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात मोठ्या प्रमाणात तरुणांनी सहभाग घेत, गावातील काही महिलांनीही स्वेच्छेने रक्तदान करत आपला सहभाग नोंदवला. यावेळी ५५ पिशव्या रक्तसंचलन झाले. जळगाव येथील रेड क्रॉस सोसायटी मार्फत रक्तसंचलन करण्यात आले.
सकाळी प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला लोकनियुक्त सरपंच सचिन पवार यांनी पुष्पहार अर्पण करत आपले मनोगत व्यक्त केले. तसेच येणाऱ्या काळात असेच उपक्रम राबवण्याचा मानस त्यांनी या वेळी व्यक्त केला. रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आले.
रेडक्रॉस सोसायटी उज्वला वर्मा व्यवस्थापक इंडीयन रेडक्राॅस सोसायटी व डाॅ.अनिल भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले सुनिल पाटील सेफ्टी ऑफिसर रेमंड यांच विशेष सहकार्य ह्या कार्यक्रमाला मीळाले.
पाळधी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षण गणेश बुवा ह्यांनी ही शिबिरास भेट देऊन कार्यक्रमाचे कौतुक केले.