जळगांव – मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशन तर्फे इतिहासाच्या पानावर,रयतेच्या मनावर,मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला शासनांच्या अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्राप्त निवेदिता ताठे,नोबेल स्कूलच्या संचालिका अर्चना सुर्यवंशी यांच्या हस्ते प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले व कोरोना काळात सामाजिक व आरोग्य क्षेत्रात कार्य करणारे स्वप्नसाकार फौंडेशनच्या भारती काळे व नोबेल स्कूलच्या संचालिका यांचा नारीशक्ती सन्मान देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित नोबेल इंटरनॅशनल स्कूल पाळधी संचालिका अर्चना सुर्यवंशी, अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते निवेदिता ताठे ,स्वप्नसाकार फाऊंडेशनच्या अध्यक्षा भारती काळे,संस्थेचे अध्यक्ष फिरोज शेख, प्रगती शाळेचे शिक्षक मनोज भालेराव, जे.सि.आय चे जिनल जैन, मोना कुमावत, सादिक शेख, आदींनी उपस्थित राहून अभिवादन केले.