जळगाव प्रतिनिधी । शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून पायी जाणाऱ्या वृद्धाच्या हातातून अज्ञात चोरट्यांनी मोबाईल लंपास केल्याची घटना 18 रोजीच्या रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील रहिवाशी भटु पंढरिनाथ वाणी (वय-५१) हे नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. गुरूवारी १८ फेब्रुवारी रोजी भटू वाणी हे बसस्थानकाजवळ मेसवर जेवण करण्यासाठी ७.३० वाजता गेले होते. जेवण करून ते रूमवर जाण्यासाठी स्वातंत्र्य चौक ते आकाशवाणी चौक दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून पायी जात असतांना मागून अज्ञात दोन चोरटे दुचाकीने येवून हातातील मोबाईल हिसकावून आकाशवाणी चौकाकडे पसार झाले.
याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.