जळगाव – शहरातील खोटेनगर भागात आजीकडे राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलीय.
सुहानाबी शेख मुस्ताक (वय-१३) रा. राज मालती नगर, दांडेकर नगर जवळ ही आपल्या आजीकडे गेल्या सहा महिन्यांपासून खोटे नगर येथे राहत आहे. आजीच्या घरी २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घरातील सर्व सदस्य खालच्या घरात होते. सुहानाबी ही वरच्या दुसऱ्या मजल्यातील खोलीत जावून दरवाजा आतून बंद करून घेतला.
ओढणीच्या मदतीने गळफास घेवून आत्महत्या केली. बराच वेळ झाल्यानंतर सुहानाबी खाली आली नसल्याने घरातील एकाने खोलीजवळ गेले. खोलीचा दरवाजा आतून बंद असल्यामुळे सुहानाबीला आवाज दिला. मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने खोलीचा मागचा दरवाजा तोडून पाहिले असता सुहानाबीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे दिसून आले. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही.
तातडीने सुहानाबीच्या आईवडीलांशी संपर्क साधून घटनेची माहिती देण्यात आली. तालुका पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचानामा केला. शवविच्छेदनासाठी जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात मृतदेह रवाना करण्यात आला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ विश्वनाथ गायकवाड करीत आहे.