रावेर – केळी पिक विम्या संदर्भात शासनाचे दोन दिवसात धोरण जाहीर झाल्यानंतरच केळी पिक विम्यासंदर्भात आंदोलन करायचे की नाही यासाठी शेतकऱ्यांची एक समिती गठीत करण्याचा निर्णय घ्यावा, आम्ही दोन्ही आमदार आपल्यासोबत असल्याची भावना आ. शिरीष चौधरी यांनी व्यक्त केली.केळी पीक विम्या संदर्भात रावेरात बैठक.
केळी पिकच्या विम्यात बदललेल्या निकषाच्या संदर्भात रावेर कृषी उपन्न बाजर समितीत एक महत्वाची बैठक आयोजित केली होती. यावेळी मोठ्या संख्येने तालुक्यातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती. बैठकित आ. चौधरी म्हणाले की, “विमा कंपनी त्यांचा अहवाल लवकरच शासनाकडे देणार आहे.केळी पीक विम्या संदर्भात रावेरात बैठक.
मुख्यमंत्री एनडीआरएस या फंडातुन काही मदत करता येईल का ?” यावर देखील सकारात्मक असल्याच्या भावना आ. चौधरी यांनी सांगितल्या. तालुक्यातील शेतकऱ्यांनी केळी पिक विमा काढू नये, यावर सर्वानुमते बहिष्कार टाकण्यात यावा, असं शेतकऱ्यांचे मत आहे . तसेच यावेळी राजिव पाटील, अमोल पाटील, विकास महाजन, रामदास पाटील, भागवत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले
सदर बैठकीला आमदार शिरीष चौधरी, आमदार चंद्रकांत पाटील, जि.प. अध्यक्षा रंजना पाटील, माजी आमदार अरुण पाटील, जि.प. सदस्य नंदकिशोर महाजन, बाजार समिती सभपती श्रीकांत महाजन, पं.स.सभपती जितु पाटील, माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, जिल्हा बँक माजी उपाध्यक्ष राजीव पाटील, माजी जि.प. सदस्य विनोद तराळ, भाजपा जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष अमोल पाटील, शेवसेना तालकाप्रमुख योगराज पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी, शेतकरी संघाचे चेअरमन पी.आर. चौधरी, सुनिल कोंडे, डॉ.राजेंद्र पाटील, राजेश वानखेडे, राजन लासुरकर, पितांबर पाटील, राजीव पाटील आदी उपस्थित होते.
अजून वाचा
राजनंदिनी संस्थेतर्फे स्मशानभूमीतील सेवकांचा सत्कार