भडगांव, प्रतिनिधी – येथील उज्वल कॉलनीसह परिसरातील ट्रान्सफॉर्मर बाबत उज्वल कॉलनीतील सर्व रहिवाशी सह मा.नगरसेविका योजना पाटील व इतर सर्व संघटना यांच्या सर्वांच्या सामुदायिक प्रयत्नातुन उज्वल कॉलनी व कॉलनी परिसराचा विजप्रश्न कायमचा सुटला आहे.
याबाबत कॉलनीतील व परिसरातील सर्व रहिवाशी, संघटना यांच्या सामुदायिक प्रयत्नांना यश मिळाले आहे. त्यासाठी विज मंडळाचे नगरसेविका योजना पाटील यांनी सर्व रहिवाशी व इतर सर्व संघटनेच्या वतीने प्रातिनिधिक स्वरुपात आभार मानले.