जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा ग्रामीण भारतीय जनता पार्टीची कार्यकारिणी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे यांनी जाहीर केली आहे. भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा ग्रामीणची जिल्हा कार्यकारणी माजी जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे नेते आ.गिरीश भाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष ग्रामीण आ. राजूमामा भोळे यांनी जाहीर केली. यामध्ये १२ उपाध्यक्ष, ३ सरचिटणीस, ११ चिटणीस, १ कोषाध्यक्ष, १ कार्यालय मंत्री, ६० सदस्य, कायम निमंत्रित सदस्य असा समावेश आहे.
उपाध्यक्ष पदी पी. सी.पाटील, पद्माकार महाजन, राकेश पाटील, डी.एस.चव्हाण, अजय भोळे, के.बी.साळुंखे, कांचन फालक, महेश पाटील, नंदकिशोर महाजन, सौ.रेखा चौधरी, भरत महाजन, डॉ.विजय धांडे यांचा समावेश आहे. सरचिटणीस पदी सचिन पानपाटील, मधुकर काटे, हर्षल पाटील, चिटणीस पदी नवलसिंग राजपूत, सौ.कविता महाजन, सौ.सविता भालेराव, अॅड.प्रशांत पालवे, राजेंद्र चौधरी, संतोष खोरखेडे, सौ.रंजना नेवे, रविंद्र पाटील, सौ.मेघा जोशी, सोमनाथ पाटील, सौ.शैलेजा चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कोषाध्यक्ष पदी अनिल खंडेलवाल, कार्यालय मंत्री पदी गणेश भगवान माळी यांना जबाबदारी देण्यात आली असून ६० कार्यकारणी सदस्य जाहीर करण्यात आले आहेत.या सर्व नवनियुक्त पदाधिकार्यांचे माजी मंत्री आ.गिरीशभाऊ महाजन, खा.रक्षाताई खडसे, खा.उन्मेष दादा पाटील, आ.संजय सावकारे, आ.मंगेश चव्हाण, आ.चंदूभाई पटेल, महाराष्ट्र राज्य जनजाती संपर्क प्रमुख किशोर काळकर, माजी आ.स्मिताताई वाघ, जि.प.अध्यक्ष रंजनाताई पाटील, डॉ.राजेंद्र फडके, अशोक कांडेलकर यांनी अभिनंदन केले आहे.