जळगाव प्रतिनिधी । जैन उद्योग समूहाचे प्रमुख अशोक जैन यांच्या वाढदिवसानिमित्त आज १० फेब्रुवारी रोजी युवाशक्ती फाऊंडेशनतर्फे लिलाई अनाथाश्रमातील १२४ गरजू मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.
शैक्षणिक साहित्यामध्ये १२४ गरजू मुलांना शाळेची बॅग, वही, पेन, पेन्सील, स्केल, रबर, शार्पनर, स्केचपेन इत्यादी चा समावेश होता. यासह काही प्रेरणादायी पुस्तके सुद्धा वाटप करण्यात आले. यामध्ये मुख्यत: पद्मश्री डॉ. भंवरलालजी जैन लिखित प्रोत्साहनपर पुस्तके देण्यात आले. सर्व साहित्य लिलाई अनाथाश्रमाचे अधिक्षक विठ्ठल पाटील यांना सुपूर्द करण्यात आले. यावेळी युवाशक्तीचे संस्थापक विराज कावडीया, सचिव-अमित जगताप, उपाध्यक्ष-संदिप सुर्यवंशी, पियुष हसवाल, प्रितम शिंदे, अमोल गोपाल, राहूल चव्हाण, प्रशांत वाणी, अर्जून भारूळे, भवानी अग्रवाल, हितेश सुर्यवंशी, नवल गोपाल, गोकुळ बारी इत्यादी उपस्थित होते.