यावल (रविंद्र आढाळे) – पंचायत समितीच्या सभापती पदी मनवेल साकळी पंचायत समिती गणातील उमेदवार तथा यावल पंचायत समिती उपसभापती दीपक अण्णा नामदेव पाटील यांची प्रभारी सभापतीपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यामुळे दोडे गुजर समाजाच्या इतिहासात त्यांच्या माध्यमातून सभापती पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडल्याने डोळे गुजर समाजातील कार्यकर्त्यांमधून त्यांचे अभिनंदन होत आहे.
यावल पंचायत समितीच्या विद्यमान सभापती सौ पल्लवी पुरूजीत चौधरी या सतरा फेब्रुवारी पर्यंत रजेवर गेल्याने त्यांच्या रिक्त जागी गटविकास अधिकारी पंचायत समिती यावल डॉ . निलेश पाटील यांनी या रिक्त जागी त्यांची नियुक्ती केली आहे दीपक पाटील यांच्या नियुक्तीमुळे माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षाताई खडसे जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार राजूमामा भोळे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी शिक्षण व आरोग्य समिती सभापती रवींद्र उर्फ छोटू सूर्यभान पाटील, भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे, माजी सभापती जिल्हा परिषद हर्षल गोविंदा पाटील, भाजपा सरचिटणीस उज्जैनसिंग पाटील, विलास चौधरी जिल्हा सरपंच परिषदेचे अध्यक्ष पुरूजीत र्चौधरी ,जिल्हा परिषद सदस्या सौ सविता भालेराव ,पंचायत समिती सदस्य योगेश भंगाळे सौ. विजया मोरे, यावल शहर भाजपाध्यक्ष डॉ. निलेश गडे , वड्री ग्रामपंचायतचे संभाव्य सरपंच अजय भालेराव , माजी पंचायत समिती सदस्य नागेश्वर साळवे , मनवेल येथील कैलास पाटील हिरामण पाटील यांच्यासह संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिपक पाटील यांचे अभिनंदन केले. पाटील यांनी कै . हरिभाऊ जावळे यांच्या निवास स्थानी जावुन त्यांच्या मातोश्री सुमनबाई जावळे व पत्नी कल्पनाताई जावळे यांची भेट घेवुन त्यांचे आशीर्वाद घेतले