यावल (रविंद्र आढाळे) – येथील शहरातील एका खाजगी वैद्यकीय सेवेत कार्यरत असलेले व नामांकीत सुप्रसिद्ध मॉलचे संचालकांचे संपुर्ण कुटुंब हे कोरोना पॉझीटीव्ह निघाल्याच्या वृत्ताने यावल तालुक्यातील आरोग्य क्षेत्रात व नागरीकांमध्ये एकच खळबळ उडाली असुन, त्या सर्व कुटुंबातील चार पुरूष आणि चार महीला असा एकुण आठ् कोरोना तात्काळ क्वारेंटाईन करण्यात आले असुन , तब्बल चार महीन्यांच्या विश्रांतीनंतर कोरोना विषाणु संसर्गाने शहरात प्रवेश केल्याने आरोग्य यंत्रणा अतिदक्ष झाली आहे.
दरम्यान तालुका आरोग्य अधिकारी डॉ . हेमंत बऱ्हाटे यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे . यावल ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्य पथकाने तात्काळ त्या कोरोना बाधित कुटुंबाचे शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेले त्यांचे हॉस्पीटल आणी मॉल बंद केले असून बाधितांपैक्की एकास जळगाव येथील कोवीड सेन्टर ला पाठवण्यात आले असुन इतर सात जणांना होमक्वारेंटाईन करण्यात आल्याचे यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अघिकारी डॉ .बी .बी . बारेला यांनी सांगीतले ,लॉक डाऊन उठविल्यांतर शासकीय यंत्रणेपासुन तर सर्वसामान्य नागरीक हे अतिश्य बेसावधपणे राहात असल्याचे चित्र सर्वत्र दिसुन येत होते. एकाच कुटुंबातील ही मंडळी वैद्यकीय व्यवसाय आणी जिवनाश्यक वस्तु विक्रीचे मोठे मॉलचे संचालक असुन त्यांचा अनेक लोकांशी शेकडो लोकांशी संपर्क असतो त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेली व्यक्तिजर पौझीटीव्ह असेल तर शहरातील कोरोना बाधीतांचा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभुमीवर आरोग्य प्रशासनास आधीक सर्तक राहावे लागणार आहे .