यावल (रविंद्र आढाळे) – राज्यातील अनुदानीत उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या वाढीव पदांच्या मान्यते संदर्भातील प्रश्न तात्काळ मार्गी लागावे अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य अनुदानीत उच्च माध्यमीक वाढीव / प्रस्तावित कृती समितीच्या वतीने काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांना शिक्षकांच्या महिला मंडळाने यावल येथे दिले.
दरम्यान महाराष्ट्र राज्यातील सुमारे १२००पेक्षा अधिक अनुदानित उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या वाढीव पदांचा घोळ २o०३, ०४ते २०१८ , २०१९पर्यंतच्या शिक्षकांचे वाढीव पदांचा प्रश्न शासन दरबारी मागील १०ते १२ वर्षापासून प्रलंबीत आहे .१२००पेक्षा अधिक शिक्षकांची पदे ही शासन मान्यता मिळवण्याच्या प्रतिक्षेत आहेत . या वाढीव शिक्षक पदांवर महाराष्ट्रतील शेकडो शिक्षक विना वेतन अध्यापनाचे कार्य करीत आहे . सदरील वाढीव शिक्षकांची पदे ही दिनांक २६ मार्च २००२च्या शासन निर्णयानुसार त्या त्या शैक्षणिक वर्षात मंजुर व्हायला पाहीजेत पण तसे न होता शासनाने हा प्रश्न अद्यापही प्रलंबीत ठेवल्यामुळे या पदावर काम करणाऱ्या शिक्षकांवर त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आलेली आहे .
समाजातील बुद्धीजीवी समजल्या जाणाऱ्या उच्च विद्याविभुवितांवर या शिक्षकांवर अशी वेळ येणे ही काही भुषणावह बाब नाही . अत्यंत बिकट आर्थिक पस्थितीत सदरील वाढीव पदावरील शिक्षक त्यांच्या वाढीव पदांच्या मान्यता मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत . या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक वाढीव पद कृती समितीने वेळोवेळी आंदोलने केली , निवेदन दिली उपोषणे केली तरीही आमच्या विंनती मागणी अर्जाची दखल न घेता अद्यापही वाढीव कनिष्ठ शिक्षक पदांचा प्रश्न मार्गी लागल्याचे दिसुन येत नसल्याने परिणामी या वाढीव पदांवर काम करणाऱ्या शेकडो शिक्षकांचे संसार उद्धवस्त होण्याची वेळ आली आहे .
शिक्षकांचे कुटुंब हे प्रचंड आर्थिक तणावासोबत मानासिक ताणतणावात हे शिक्षक आहेत . तरी राज्य शासना आमच्या मागणीची दखल घेवुन सदरील वाढीव शिक्षक पदांना वेतन अनुदानासह मान्यता देवुन त्यांची होणारी हेळसांड थांबवावी व ज्ञानदानासारखे पवीत्र काम मागील १oते १२ वर्षापासुन विनावेतन इमान इतबाराने ज्ञानदानाचे काम करणाऱ्या शिक्षकांना न्याय मिळुन द्यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य अनुदानित कनिष्ठ महाविलयीन वाढीव प्रस्तावीतपद कृती समितीच्या वतीने दिलेल्या निवेदनावर श्रीमती सोनाली भाईदास पाटील, श्रीमती नम्रता रमेश महाजन , श्रीमती रूपाली अरूण कोळी यांच्या स्वाक्षरी असुन , या प्रसंगी पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील ,राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रा . मुकेश येवले , युवक राष्ट्रवादीचे अड. देवकांत पाटील , बोदडे नाना, धिरज कुरकुरे, अल्ताफ तडवी आदी उपस्थित होते .