जळगाव : दसरा आणि झेंडूची फुले यांचे समीकरण असल्यामुळे दसरा सणासाठी जळगावात झेंडू फुलांची आवक झाली आहे. झेंडूची आवक असल्यामुळे किरकोळ बाजारात प्रतिकिलो शंभर ते दीडशे रूपयांचा भाव झेंडूला आला आहे. यंदा करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सगळेच सण-उत्सव साध्या पध्दतीने साजरे होत आहेत. त्यातच अलीकडेच झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे झेंडू फूल शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. जळगावात आज झेंडू फुलांना १५० रुपये किलोची मागणी.
त्यामुळे फुलांची आवक खूपच घटली आहे. आवक कमी आणि किलोची मागणी जास्त यामुळे झेंडूचा दर दसरा सणाच्या पूर्वसंध्येला दीडशे रुपये किलो पर्यंत पोहचला आहे.
जळगावात टॉवर चौक परिसरातील फुलांचा बाजार भरतो. तेथेच पूजा साहित्याचीही विक्री होते. संध्याकाळी फुलांच्या बाजारात फुलांसह पूजेचे साहित्य खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. वाढती मागणी पाहता झेंडू दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.
करोना विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असला तरी त्याचे भय कायम आहे. त्यामुळे सारे सण-उत्सव साध्या पध्दतीनेच साजरे होत आहेत. त्यामुळे सजावट, घरातील पूजा आणि पुष्पहारांसाठी भक्त आणि मंदिरांमध्ये झेंडू फुलांचा वापर दसरा सणामध्ये होतो. परंतु करोना प्रादुर्भावामुळे सर्व देवस्थाने बंदच आहेत. परिणामी झेंडूला अपेक्षित मागणी दिसत नाही. तथापि, घरगुती पूजेसाठी झेंडू फुलांना भाव आहे.
झेंडू फुलांप्रमाणेच केळीच्या खुंटांना दसरा सणात धार्मिक पूजा विधीसाठी मान असतो. अतिवृष्टीने केळीच्या बागांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. परिणामी, बाजारात विक्रीसाठी केळीचे खुंट कमी प्रमाणात उपलब्ध झाले आहेत. केळीचे खुंटीचे एक संच ६० रूपयांस खरेदी केले जात होते.
अजून वाचा
डॉ. केतकी पाटील यांना महिला गौरव पुरस्कार प्राप्त