Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

राम मंदिराचा निर्णय देशाने संयमाने स्वीकारला

सरसंघचालक मोहन भागवत

by Divya Jalgaon Team
October 25, 2020
in राज्य
0
news

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आज, रविवारी नागपुरात पार पडतो आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या विजयादशमी सोहळ्यालाला पहिल्यांदाच स्वयंसेवकांच्या कवायती नाही. त्यामुळे आरएसएसच्या पारंपारिक दसऱ्या सोहळा यंदा खंड पडला आहे. आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हडगेवार सभागृहात शस्त्रपूजन केलं, त्यानंतर उत्सवाला सुरुवात झाली. फक्त मोजक्याज ५० स्वयंसेवकांच्या उपस्थितीत हा सोहळा सुरु आहे. प्रमुख अतिथी म्हणून कुणालाही आमंत्रित करण्यात आलेलं नाही.

यावेळी बोलताना मोहन भागवत म्हणाले की, पहिल्यांदाच कमी लोकांच्या उपस्थित विजयादशमीचा कार्यक्रम घेण्यात आला. यंदा संपूर्ण जगावर करोनाचं संकट आलं आहे. या संकटकाळात संपूर्ण देश एक झाला. सर्वांनी मिळून करोनासोबत लढा दिला आहे. करोनामुळे रोजगार सोडून गावी गेलेला मजूर परत येत आहे. परतलेल्यांना पुन्हा रोजगार आहेच असं नाही. गरज पडल्यास त्यांना आता नवीन रोजगार शोधावा लागेल.

२०१९ मध्ये कलम ३७० हटवण्यात आलं शिवाय ९ नोव्हेंबर रोजी न्यायालयानं राम मंदिराचा ऐतिहासिक निर्णय दिला. संपूर्ण देशानं हे निर्णय संयमानं स्वीकारले. याशिवाय सीएएचा देशातील कुठल्याही नागरिकाला धोका नाही, असे भागवत म्हणाले.

सीएएविरोधी देशात निदर्शनं झाली. निषेध नोंदवण्यात आला. त्यामुळे देशात तणाव निर्माण झाला. पण सीएएचा देशातील कोणत्याही नागरिकाला धोका नाही. सीएएवर अधिक चर्चा होण्यापूर्वी, यावर्षी देशावर करोनावर संकट आलं, असे भागवत म्हणाले.

Share post
Tags: Lokmat NewsMarathi NewsMohan BhagwatNagpur NewsRam Mandir
Previous Post

अवैध वाळू वाहतुकीचे डंपर सोडविणे पडले महागात

Next Post

जळगावात आज झेंडू फुलांना १५० रुपये किलोची मागणी

Next Post
jalgaon news

जळगावात आज झेंडू फुलांना १५० रुपये किलोची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group