Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

डॉ. केतकी पाटील यांना महिला गौरव पुरस्कार प्राप्त

by Divya Jalgaon Team
October 24, 2020
in जळगाव
0
ketki patil news

जळगाव-   डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या संचालिका डॉ. केतकी पाटील यांना नाशिक येथील समृध्दी बहुउद्देश्यीय सामाजिक संस्थेतर्फे महिला गौरव पुरस्कार-२०२० जाहीर करण्यात आला आहे. कोरोनाच्या आपत्तीत केलेल्या सेवेबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या संचालिका डॉ. केतकी पाटील यांनी नाशिक येथील समृध्दी बहुउद्देश्यीय सामाजिक संस्थेतर्फे महिला गौरव पुरस्कार-२०२० नुकताच प्रदान करण्यात आला. यावेळी  डॉ. केतकी पाटील म्हणाल्या की, कोरोनाच्या आपत्तीत आमच्या हॉस्पीटलमध्ये अतिशय उच्च दर्जाची वैद्यकीय सुविधा पुरविण्यात आली असून आता या पुरस्काराच्या माध्यमातून आमच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळाल्याचा आनंद वाटत आहे.

तसेच  डॉ. केतकी पाटील म्हणाल्या  की, एप्रिलपासून कोरोनाचा प्रकोप सुरू झाल्यानंतर आम्ही लागलीच उपचार सुरू केले. दुसरीकडेही उपचार असले तरी कोरोनाच्या रूग्णांसोबत कुणी सुसंवाद करण्यासाठी धजावत नव्हते. आम्ही मात्र आलेल्या प्रत्येक रूग्णाला आस्थेवाईकपणे बोलून, त्याच्याशी संवाद साधून त्यांना प्रेरीत करण्याचा प्रयत्न केला.

यासाठी माझ्या एकटीचे नव्हे तर आम्हा सर्व सहकार्‍यांचे याच अगदी डॉक्टर्सपासून ते नर्सिंग, वॉर्ड बॉय, प्रशासकीय यंत्रणा आणि अगदी स्वीपर्स पर्यंतच्या सर्वांचे सहकार्य लाभले. यामुळे आम्ही कोरोनासारख्या अतिशय कठीण कालखंडातही रूग्णांची सेवा करू शकलो. यामुळेच हा पुरस्कार आमच्या सर्व सहकार्‍यांना समर्पित असल्याचे प्रतिपादन डॉ. केतकी पाटील यांनी केले.

अजून वाचा 

शेतकऱ्यांचे कौशल्य विकसित करण्यासाठी प्रशिक्षण

Share post
Tags: Dr. Ketki Patil NewsJalgaon newsMarathi NewsWomen's Pride Award
Previous Post

शेतकऱ्यांचे कौशल्य विकसित करण्यासाठी प्रशिक्षण

Next Post

युवा गुर्जर महासभेच्यावतीने महिलांना साडी भेट

Next Post
jalgaon news

युवा गुर्जर महासभेच्यावतीने महिलांना साडी भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group