जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील शिवाजी नगर परिसरात दारू विक्रीसाठी परवानगी देऊ नका अशी मागणी स्थानिक रहिवाश्यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शिवाजी नगर परिसरातील भाग इंद्रप्रस्थनगर, जनाई नगर, शिव शंकर कॉलनी, राधाकृष्ण नगर, दत्तात्रयनगर, त्रिभुवन कॉलनी वा भाग अतिशय शांतताप्रिय व उच्चभ्रु वस्ती असलेला भाग आहे. या भागात राहणारे वसंतराव शामराव चौधरी यांनी नुकतेच दोन वर्षापुर्वी राजाराम हॉल लग्न कार्यालयासाठी मंगल कार्यालयाची मागणी केलेली आहे व त्यांनी वर नमुद जागेत नुकतेच हॉटेल व्यवसाय व त्यासोबत दारू विक्रीचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार असून तसे प्रयत्न व हालचाली सुरु केलेल्या आहेत. स्थानिक रहिवाशांना सदर बांधकामाच्या अनुषंगाने अतिशय दाट लोक वस्तीचा असुन याठिकाणी खाजगी रहिवास असुन कुठल्याही व्यवासायीक वापरासाठीची जागा नाही. असे असताना यांची कायदेशीर रितसर परवानगी न घेता बेकायदेशीररित्या राजाराम हॉलची बांधकाम करण्यात आलेले आहे.
तसेच वसंतराव शामराव चौधरी यांनी नुकतेच कॉलनीतील संबंधीत अधिकाऱ्यांना संपर्क करुन व शेजारी राहणाऱ्या लोकांकडे दारु दुकान टाकणार असल्याची माहिती परिसरातील नागरीकांना सांगून ठेवले आहे. तरी जिल्हा प्रशासनाने याची दखल घेवून आपल्या कार्यालयाकडून दारू विक्रीचा कोणताही परवाना देऊ नये, अन्यथा भविष्यात होणाऱ्या आंदोलनाला सामोरे जावे लागेल असे नमूद केले आहे.