जळगाव : गेले जवळपास वर्षभर कोविड-19 म्हणजेच कोरोना विषाणूचे थैमान जगभर सुरु आहे. आपल्या देशातही हे संक्रमण भयंकर प्रमाणात फैलावले होते. भारत सरकारने केलेल्या लॉकडाऊन मध्ये डॉक्टर, हॉस्पिटल कर्मचारी, पोलीस, मनपा कर्मचारी इत्यादी हे कार्यरत होते. त्याचप्रमाणे बँक कर्मचारी सुद्धा पहिल्या दिवसापासून जनतेच्या सेवेत कार्यरत होते. इतर कोरोना योदध्याप्रमाणे बँक कर्मचारीही आपली ग्राहक सेवेचे कर्तव्य जबाबदारीने पार पाडत होते.
दि जळगाव पीपल्स को-ऑप बँकेने कोरोना काळात दिलेल्या बँकींग सेवेबद्दल बँकेच्या एमजे कॉलेज शाखेचे ग्राहक मा.सौ. शैला तुकाराम बिराजदार व मा.श्री. तुकाराम श्रीपतराव बिराजदार यांनी एमजे कॉलेज शाखेचे शाखा व्यवस्थापक व कर्मचार्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. बँकेने दिलेल्या सेवे बद्दल सौ व श्री बिराजदार यांनी बँकेचे चेअरमन, संचालक व व्यवस्थापन यांना हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन दिले.