मुंबई- खूप दिवसांपासून नाराज असलेल्या एकनाथराव खडसे यांनी अखेरभाजपला रामराम ठोकला असून त्यांनी राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान खडसे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या सूनबाई भाजप खासदार रक्षा खडसे काय निर्णय घेणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. मात्र आपण भाजपमध्ये राहणार असून पक्ष सांगेल ती जबाबदारी स्वीकारणार असल्याचं खासदार रक्षा खडसे यांनी सांगितले.
खासदार रक्षा खडसे म्हणाल्या की, बाबांचा (एकनाथ खडसे) निर्णय दु:खद आहे. मी भाजपकडून निवडून आलेली आहे. लोकांनी मला भाजपकडून निवडून दिलंय. त्यामुळं मी पक्षातच राहणार आहे. पक्ष जी जबाबदारी देईल, ती पूर्ण करणार. नाथाभाऊंनी देखील पक्षाचं योगदान मान्य केलंय. ४0 वर्ष त्यांनी पक्ष वाढवला.
मात्र आज त्यांनी व्यक्तिगत कारणांमुळं त्यांनी राजीनामा दिलाय, असं त्या म्हणाल्या. रक्षा खडसे म्हणाल्या की, बाबांनी माझ्यावर कधीच कुठला दबाव टाकलेला नाही. त्यांचं आणि माझं मत जनतेची सेवा करणं हेच आहे.
मी कधीपर्यंत पक्षात राहणार याचं भाकित कुणीच करु शकत नाही. कुणाबाबतच असं भाकित आपण करु शकत नाही. आता आपण भाजपमध्येत असल्याचं रक्षा खडसे म्हणाल्या.
अजून वाचा
एकनाथराव खडसे देणार भाजपचा राजीनामा