मुक्ताईनगर- भाजपचे ज्येष्ठ माजी मंत्री एकनाथराव खडसे हे अखेर आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याची माहिती समोर आली असून यामुळे आता त्यांचा राष्ट्रवादीतील जाण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे दिसून येत आहे. एकनाथराव खडसे यांनी पक्षाकडे आपला राजीनामा सुपूर्द केला असून याबाबत लवकरच घोषणा होणार असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे.
खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशामुळे भाजपामधील नाराज आणि फडणवीस विरोधी गट आता राज्यात सक्रिय होवू शकतो. पक्ष नेतृत्वापुढे फडणवीस आणि त्यांच्या समर्थकांना अडचणीत आणण्याचे डाव फडणवीस विरोधी नेत्यांनी टाकल्यास त्याला एकनाथराव खडसे यांनी पाठबळ दिल्यास राज्यभरात भाजपमध्ये उभे दावे निर्माण होवू शकतात. असा राजकिय जाणकारांचा अंदाज आहे.
एकनाथराव खडसे यांचा स्वभाव व कामाची पध्दत पाहता ते फडणवीस विरोधी गटाला बळ देण्याच्या हालचाली करू शकतील मात्र ते आपले डावपेच राज्यभर चालवतात की उत्तर महाराष्ट्र पुरते मर्यादित ठेवतात हे येणाऱ्या काळातच कळेल. या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी मंत्री एकनाथराव खडसे हे अखेर आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याची माहिती समोर आली असून यामुळे आता त्यांचा राष्ट्रवादीतील जाण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे दिसून येत आहे. एकनाथराव खडसे यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाकडे पाठवल्याची माहिती मिळाली आहे. थोड्याच वेळात स्वत: एकनाथराव खडसे जाहीरपणे आपली भूमिका स्पष्ट करत भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे अधिकृतपणे सांगणार आहेत.
अजून वाचा
शुक्रवारी खडसे हातावर बांधणार राष्ट्रवादीचे घड्याळ