मुंबई – भाजपाचे ज्येष्ठ माजी मंत्री तथा मातब्बर नेते एकनाथराव खडसे राष्ट्रवादी प्रवेश करणार असल्याची माहिती आज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन एकनाथराव खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची महत्त्वाची घोषणा केली. शुक्रवारी दुपारी दोन वाजता एकनाथराव खडसे हे मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे असल्याचे ते म्हणाले. एकनाथराव खडसे यांच्यासारखे अनुभवी नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
एकनाथराव खडसे यांना पक्षात काही मोठे पद मंत्रीपद दिले जाणार का? या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले की, याबाबत पक्ष लवकरच विचार करणार आहे. एकनाथराव खडसे यांच्यासोबत येण्यासाठी अनेक नेते इच्छुक आहेत, मात्र सध्यातरी पोटनिवडणुकीत सारखा प्रकार लॉकडाऊनमुळे होणार नसल्यामुळे तूर्तास त्यांच्यासोबत कोणी येणार नसल्याचे त्यांनी संकेत दिले आहे.
अजून वाचा
एकनाथराव खडसेंचा २२ ऑक्टोबरला राष्ट्रवादीत प्रवेश?