जळगाव– राजकारणात मतमतांतरं असणं स्वाभाविक आहे. मी कायम लोकशाही मानत आलेलो आहे. म्हणून आपलं मत इतरांनाही लागू व्हावं हे लोकशाहीच्या तत्वात बसत नाही. कदाचित एखादी व्यक्ती किंवा एखादा समूह आपल्यापेक्षा वेगळा विचार करत असेल किंवा आपली मतं त्याला पटत नसतील तर त्याला त्याबद्दल स्वातंत्र्य आहे. म्हणून त्याला कुठल्या तरी षडयंत्राने गप्प बसवणे, धटधापटशाही मार्गाने संपवणे हा मार्ग चुकीचा आहे. महाराष्ट्राच्या सभ्य सामाजिक व राजकीय परंपरेने अजून इतकी खालची पातळी गाठल्याची माहिती माझ्या ऐकिवात नव्हती. शकत नाही
गेली अनेक वर्षे मी राष्ट्रवादी काँग्रेसचे श्री पवार यांचा पुरोगामी विचारांशी निष्ठा बाळगून सामाजिक व राजकीय वाटचाल करीत आहे. गेल्या जानेवारी महिन्यात मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जळगाव महानगर जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे हातात घेऊन शहरात पक्ष वाढावा, लोकांची कामे मार्गी लागावीत,
त्यांना शासनदरबारी चकरा न मारता त्यांचे प्रश्न सोडवले जावेत म्हणून पूर्णपणे जनहितासाठी झोकून दिलंय. शहरातील रस्त्यांची, पाण्याची, कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी मनपा प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून, सत्ताधाऱ्यांना धारेवर धरून सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी लढत राहिलो. फक्त मी नाही तर माझ्यासमवेत पक्षाची शहरातील सर्व मंडळी यावेळी सोबत होती. सत्ताधाऱ्यांचे अनेक भ्रष्टाचार उघड करून जनतेसमोर त्यांची पोलखोल केली. व याबाबत न्याय मागितला.
आज मात्र काही मी कुठल्याही आमिषाला बळी पडुन त्यांना शरण जात नाही म्हणून मला ‘हनी ट्रॅप’ सारख्या गलिच्छ प्रकरणात अडकवून माझी बदनामी करण्याचा डाव आखत आहेत. मी सत्याच्या मार्गावर आहे. माझं काम तुम्हाला पटत नसेल तरी हरकत नाही. पण म्हणून अशा पद्धतीने माझा काटा काढण्याचा प्रयत्न करणं म्हणजे हा तुमचा नैतिक पराभव आहे. युद्धाचे काही संकेत असतात. काही नियम असतात. तसंच राजकीय आणि सामाजिक आयुष्यातही काही नियम असतात. परंतु माझ्या बाबतीत जो घाणेरडा प्रकार काही लोक करत आहेत तो घृणास्पद आहे.
तुम्हाला जर वाटत असेल की, अशा पद्धतीने अडकवून आपण मला थांबवू शकाल तर तो तुमचा गैरसमज आहे. त्याच ताकदीने उत्तर मिळेल अशी प्रतिक्रिया अभिषेक पाटील यांनी सोशल मीडिया वरून दिली आहे.
अजून वाचा
Crime : हनी ट्रॅप प्रकरणात महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल