मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा सध्या दुबईत असून तिच्या किंग्स इलेव्हन पंजाब या आयपीएल टीमला पाठिंबा देत आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाचा आयपीएलचा हंगाम प्रेक्षकांविनाच दुबईमध्ये आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे प्रितीसुद्धा तिच्या टीमसोबतच तिथेच आहे. करोना चाचणीचा संसर्ग होऊ नये म्हणून आयपीएलशी जोडले गेलेले लोक अनेक गोष्टींची काळजी घेत आहेत. अशातच प्रितीसुद्धा सर्व प्रकारची काळजी घेत असून ती वेळोवेळी करोना चाचणी करून घेत आहे.
प्रितीने आतापर्यंत तब्बल २० वेळा करोना चाचणी केली आहे आणि त्या सर्व चाचण्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत. तिने नुकतीच विसावी करोना चाचणी केली आहे. प्रितीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्यात तिने वीस वेळा करोनाची चाचणी केल्याचं सांगितलं आहे. ‘आता मी करोना टेस्ट क्वीन बनलीये’, असंही ती यात म्हणताना दिसतेय.
‘आयपीएलचा हंगाम सहा दिवस क्वारंटाइनमध्ये राहिल्यानंतर सुरू झाला आणि दर तीन-चार दिवसांनी कोविड-१९ ची चाचणी केली जाते. आम्ही कुठेच बाहेर जाऊ शकत नाही. करोना महामारीच्या काळात आयपीएल सुरू आहे हेच कौतुकास्पद आहे’, असं तिने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय.
अजून वाचा
रितेश देशमुखने केले अवयवदानाचे आवाहन