नंदुरबार- धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर विसारवाडी येथे कोंडाईबारी घाटात एक खाजगी बस दुसरीला ओव्हरटेक करत असताना दरीत कोसळली.यात ५ व्यक्तींचा मृत्यू झाला यापैकी दोघांचा मृतदेह बाहेर काढण्यात आलेत.
तसेच मदत कार्य सुरू आहे. २६ जखमींना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात तर इतरांना खाजगी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. अशी माहिती नवापूरचे तहसीलदार यांच्याकडून मिळाली आहे.
सदर अपघातातील जखमींमध्ये जळगाव जिल्ह्यातील १५ नागरिकांचा यात समावेश आहे.
जखमी व्यक्तींची नावे
सैय्यद हरून सैय्यद समत (वय-३४) जळगाव, कान्हीलाल बाबुला बागुल (वय-३५), साक्री, धुळे, सय्यद हरुण सय्यद संमत (वय-३४), सय्यद रियान सय्यद हरून (वय-१५), आयुब खान सांडे खान वय 55, समाधान सचिन पाटील (वय 28) सर्व रा. जळगाव, मुकेश रामचंद्र खाटीक (वय-३७), नाशीर खान सुभान खान (वय-३४) रा. सुरत, शांताराम किसन धनगर (वय-३८), निलेश शांताराम धनगर (वय-२२) रा. भादली ता. जि.जळगाव, फारुख शेख गणी (वय-५२) रा. सुरत, सय्यद जोया सय्यद हरून (वय-१८), कुरशीनबी सांडे खान (वय-७०), अफसाना सय्यद (वय-३२), अख्तरबी आयुब खान (वय-६०) सर्व रा. जळगाव ,
रेखा समाधान पाटील (वय-२६), उशा शांताराम धनगर (वय-४०) रा. भादली ता.जि.जळगाव , पुष्पाबाई विलास पाटील (वय 50) सुरत, भाग्यश्री समाधान पाटील (वय २), प्रिया समाधान पाटील (वय-९) रा. जळगाव रोशनी अमर बारी (वय-२४) रा. सुरत, जयेश भानुदास वाघोदे (वय 28) जळगाव, उर्वशी विनोद पाटील (वय 10) सुरत, शोभा अनिलसिंग (वय 48) भादली ता.जि.जळगाव, अनिल सदानंदसिंग (वय-५२) भादली, शेख नाजियाबी सलार (वय 35) आणि शेख खलील शेख इसा (वय-५५) रा. सुरत अशी जखमींची नावे आहेत. यात १५ जण जळगाव जिल्ह्यातील आहेत.