जळगाव- २१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाख मधील भारताच्या सिमेवर बर्फाच्छादित व निर्जन ठिकाणी केंद्रीय राखीव पोलीस दलातील १० जवान गस्त घालत होते . यावेळी दबा धरुन बसलेल्या चिनी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात दहा जणांना विरगती प्राप्त झाली होती .
या घटनेने देशात दुःखाची लहर पसली होती . वीर जवानांनी दाखविलेल्या या अतुलनीय शौर्यापासुन इतरांना स्फुर्ती मिळावी , तसेच आपल्या कर्तव्याची व राष्ट्र निष्ठेची जाणीव व्हावी म्हणुन शहीद जवानांच्या स्मृती प्रित्यर्थ २१ ऑक्टोबर हा दिवस संपुर्ण देशात पोलीस हुतात्मा दिवस म्हणुन पाळला जातो .
यानिमित्ताने जळगाव (ग्रामीण) तालुका काँग्रेस कडुन अभिवादन आपले कर्तव्य पार पाडत असतांना देशासाठी प्राण गमावलेल्या हुतात्म्यांना पोलीस स्मृतीदिना निमित्त जळगांव ( ग्रामीण ) तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आदरांजली हे राष्ट्र त्यांचे बलिदान कधीच विसरणार नाही , अशा शब्दात जळगांव ( ग्रामीण ) काँग्रेसने अभिवादन केले आहे .
यावेळी तालुका अध्यक्ष मनोज चौधरी, प्रा. भाऊसाहेब सोनवणे, भिकन सोनवणे, प्रमोद घुगे, धनराज कोळी आदी उपस्थित होते.