जळगाव – शिवाजीनगर व जाफर खान चौक या परिसरातील नागरिकांनी महानगरपालिकेच्या पूर्वी असलेल्या जागेवरच सार्वजनिक शौचालय बांधून मिळावे तसेच या शौचालयाचे बांधकाम पूर्ण होत नाही तोपर्यंत म न.पा.कडून फिरते शौचालय आणुन उभे करुन द्यावे, असे मागणीपर निवेदन आयुक्तांना दिले आहे.
या निवेदनात नमूद केले आहे की, शिवाजीनगर व जाफर खान चौक या भागामध्ये मागील अनेक वर्षापासून महानगरपालिके मार्फत नागरी सुविधा पुरविण्यात येत आहेत. शिवाजी नगर भागामध्ये महाराष्ट्र दालमिल समोर, शिवाजी नगर हुडकोला लागून गेल्या अनेक वर्षापासून एकूण ४० सार्वजनिक शौचालय (२० स्त्रीयांसाठी व २० पुरुषांसाठी) होते. सदरील सर्व सार्वजनिक शौचालयाचा उपयोग परिसरातील शिवाजी नगर,हुडको, भुरे मामलेदार,काळे नगर,मिझा चौक व इतर भागातील नागरिक करीत होते.
मागील वर्षी म्हणजेच सन.२०१९ मध्ये ” स्वच्छ भारत अभियान ” या योजने अंतर्गत सदरील सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती तसेच नविन पाण्याची बोरींग, शौचालयांना नविन दरवाजे, भांडे, तसेच इलेक्ट्रीक फिटींग इ.सर्व सुविधा या नुकत्याच करण्यात आलेल्या होत्या, त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
परंतु आता दोन महिन्यापूर्वी परिसरातील नागरिकांना काहीएक पूर्वसूचना न देता व शौचासाठी इतर कुठलीही व्यवस्था न करता सदरील शौचालयांना नविन बांधुन देण्याच्या नावाखाली तोडण्यात आलेल्या आहेत. सदरील शौचालये तोडल्यामुळे परिसरातील वृध्द नागरिकांचे तसेच महिलांचे रात्री- बेरात्री खूपच हालत होत आहेत. म.न.पा.कडून शौचालयासाठी दुसरी सुविधा उपलब्ध केली नसल्यामुळे अनेक लोक तर उघड्यावरच शौचासाठी बसत आहेत. यामुळे परिसरात संपूर्ण दुर्गंधीचे वातावरण पसरलेले आहेत. यामुळे या परिसरातील संपूर्ण नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. त्यामुळे साधीचे आजार पसरण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.
सर्व नागरिक परिसरातील सर्व नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते युसूफ शहा यांचे नेतृत्वाखाली या निवेदनाद्वारे आपणास विनंती करतो की, सदरील सार्वजनिक शौचालये आम्हांस आहे त्याच जागी बांधून देण्यात यावीत. या मागणीवर येत्या ८ दिवसात योग्य ती कार्यवाही करण्यात येऊन शौचालयाचे बांधकाम आहे त्याच जागी सुरु न केल्यास परिसरातील सर्व नागरिक आंदोलन करतील असा इशारा देखील देण्यात आला आहे. या निवेदनावर नागरिकांनी स्वाक्षरी केल्या आहेत.