Sunday, November 30, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

अमळनेरात राष्ट्रवादी कॉग्रेसची तालुका बैठक संपन्न

by Divya Jalgaon Team
December 5, 2020
in जळगाव, राजकीय
0
अमळनेरात राष्ट्रवादी कॉग्रेसची तालुका बैठक संपन्न

अमळनेर- राष्ट्रवादी काँग्रेसने  अमळनेर तालुका बैठकीचे आयोजन कऱण्यात आले होते. याबैठकीच्या वेळी जळगाव जिल्ह्यातील आगामी

यावेळी जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, माजी आमदार मनीष जैन, जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटील, जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील, धरणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन,  राष्ट्रवादी युवक प्रदेश प्रवक्ता योगेश देसले, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, मंगला भोसले, सुवर्णा पाटील, कल्पिता पाटील, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी, जि.प.सदस्या जयश्री पाटील, राष्ट्रवादी जिल्हा महिलाध्यक्षा कल्पना पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला तालुकाध्यक्ष योजना पाटील, महिला राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस रंजना देशमुख, मीनाक्षी चव्हाण, रिटा बाविस्कर, आशा चावरीया, अलका पवार, दहिवदच्या सरपंच सुषमा देसले आदी उपस्थित होते.

अरविंद मानकरी, योजना पाटील, कल्पना पाटील, रंजना देशमुख, तिलोत्तमा पाटील, मनीष जैन, विलास पाटील आदी सर्वांनी खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम सप्ताहभर राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.  त्यानिमित्ताने चर्चा व मार्गदर्शन केले तसेच  १२ तारखेला रणनीती कशी असेल याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी दूरध्वनीवरून कार्यक्रम कसा साजरा करावा, पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त समारंभ व्हिडीओ कॉन्फरन्सने व लिंकद्वारे पाहता येईल. याबाबत बैठकीतील कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

आमदार अनिल पाटील यांनी १२  तारखेला पक्षाचे झेंडे लावून तरुणाई फोटो काढून शेअर करतील व तालुक्यात ५० ते ६० हजार कॅलेंडर वितरण करण्यात येतील व अमळनेर तालुका पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम राबविण्यात एक नंबर कसा राहील याबाबत हमी दिली व विविध कार्यक्रम राबविण्यात येतील याची ग्वाही दिली.  तसेच लॉकडाऊन नंतर आता जनसंपर्क साधण्यासाठी ही नामी संधी असल्याचे मत आमदार पाटील यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी कोव्हीड रणरागिणी अरुणा बाऱ्हे तर कोव्हीड योध्ये म्हणून रवींद्र मराठे, हरीश चौधरी, सुभाष सोनवणे, प्रसाद पाटील आदींना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद कदम यांनी केले तर प्रस्ताविक तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी केले. यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सचिन पाटील, शहराध्यक्ष मुख्तार खाटीक, कार्याध्यक्ष प्रा.सुरेश विक्रम पाटील, शहर युवक अध्यक्ष बाळू पाटील, शिवाजी पाटील सर्व फ्रंटलचे अध्यक्ष, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, बाजार समिती संचालक, शेतकी संघ सदस्य, युवक, महिला तसेच सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Share post
Tags: AmalnerDivya JalgaonJalgaonJalgaon Latest NewsJalgaon Marathi Newsjalgaon political newsPoliticalअमळनेरात राष्ट्रवादी कॉग्रेसची तालुका बैठक संपन्न
Previous Post

शिवाजीनगरात शौचालयाच्या बांधकामांसाठी आयुक्तांना निवेदन

Next Post

बीएचआर प्रकरणी पुढील सुनावणी ८ तारखेला होणार

Next Post
बीएचआर प्रकरणी ललवाणी बनले पुणे न्यायालयात त्रयस्थ अर्जदार

बीएचआर प्रकरणी पुढील सुनावणी ८ तारखेला होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group