जळगाव – सध्या बीएचआर घोटाळ्याचे प्रकरण सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. या प्रकरणात ठेवीदारांना न्याय मिळतो का? यावर आता लक्ष लागले आहे. जिल्हा न्यायालयात बीएचआर’च्या ठेवीदारांची फसवणूकीच्या विविध ८१ गुन्ह्यांच्या खटल्याची सुनावणी कोरोनामुळे थांबली होती. आज ‘बीएचआर’चे संचालक प्रमोद रायसोनीसह १३ जणांची व्हीडीओ कॉन्फरन्सिंगने सुनावणी होती. परंतू आज देखील यावर कामकाज होऊ शकले.आता पुढील सुनावणी ८ डिसेंबरला होणार आहे.
बीएचआरचे संचालक प्रमोद रायसोनीसह १३ जण ठेवीदारांची फसवणूक प्रकरणी वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात दाखल ८१ गुन्ह्यांच्या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायालयात सुरू होती. परंतू कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या खटल्याची नियमित सुनावणी थांबली होती.
त्यानंतर ५ डिसेंबर रोजी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगने सुनावणी होणार होती. परंतू आज सुनावणी होऊ शकली नाही. आता ८ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, ‘बीएचआर’चे संचालक प्रमोद रायसोनी व १३ संचालकांना २०१५ मध्ये अटक करण्यात आली आहे. ते आता जिल्हा कारागृहात बंदी आहेत. या गुन्ह्याची व्याप्ती पाहता तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला होता. त्यानुसार सीआयडीने तपास करून काही गुन्ह्यांचे दोषारोप, पुरवणी दोषारोप न्यायालयात दाखल केले आहेत.