Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

पारंपरिक मतदारसंघही भाजपने यावेळी गमावले – एकनाथराव खडसे

by Divya Jalgaon Team
December 5, 2020
in जळगाव, राजकीय
0
Breaking : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना ईडीची नोटीस

जळगाव- नुकताच झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे चांगलेच राजकारण रंगतांना दिसत आहे, या  निवडणुकीत महाविकास आघाडीने जोरदार बाजी मारत भाजपला  धक्का देत घवघवीत यश मिळवले आहे.  यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांनी देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार निशाण साधला आहे .

‘पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपची पिछेहाट झाली आहे. पारंपरिक मतदारसंघही भाजपने यावेळी गमावले. हे भाजपच्या नेतृत्वाचे अपयश आहे. भाजप नेतृत्वाच्या अहंपणामुळेच ही वेळ आली आहे,’ अशा शब्दांत एकनाथराव खडसेंनी टीका केली आहे.

कुणी पक्षातून बाहेर पडले म्हणजे पक्षाला काय फरक पडतो हे आता चंद्रकांत पाटील यांना कळेल. ते म्हणाले होते की, हिमालयात निघून जाईन, आता मी तेच बघतोय ते हिमालयात निघून जातात का? असा चिमटा देखील खडसेंनी काढला. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपची पिछेहाट झाली आहे. पारंपरिक मतदारसंघही भाजपने यावेळी गमावले. हे भाजपच्या नेतृत्वाचे अपयश आहे. भाजप नेतृत्वाच्या अहंपणामुळेच ही वेळ आली आहे, अशा शब्दांत एकनाथराव खडसेंनी टीका केली आहे.

काल पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले .  या निकालाबाबत एकनाथ खडसे यांनी सांगितले की, या निवडणुकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या नागपूर मतदारसंघातील जागा गेली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या पुणे मतदारसंघाची जागा गेली. कुणी पक्षातून बाहेर पडले म्हणजे पक्षाला काय फरक पडतो हे आता चंद्रकांत पाटील यांना कळेल.

ते म्हणाले होते की हिमालयात निघून जाईन, आता मी तेच बघतोय ते हिमालयात निघून जातात का? असा चिमटा देखील खडसेंनी काढला.  या निवडणुकीत सहापैकी पाच जागांवर महाविकास आघाडीला यश आले. एका जागेवर भाजपचा उमेदवार निवडून आला. परंतु, महाविकास आघाडीचे मतदान फुटले म्हणून आम्हाला विजय मिळाला, असे खुद्द भाजपने मान्य केले आहे. म्हणजेच सहाच्या सहा जागांवर भाजपची पिछेहाट झाल्याचे स्पष्ट झाले आहे, असेही खडसेंनी सांगितले.

Share post
Tags: Divya JalgaonEknathrao KhadseJalgaonMarathi NewsPoliticalपारंपरिक मतदारसंघही भाजपने यावेळी गमावले - एकनाथराव खडसे
Previous Post

खान्देशी पूनरविवाह गृपने घटस्पोट होणाऱ्या दोन जीवांना केले एकत्र

Next Post

शिवाजीनगरात शौचालयाच्या बांधकामांसाठी आयुक्तांना निवेदन

Next Post
शिवाजीनगरात शौचालयाच्या बांधकामांसाठी आयुक्तांना निवेदन

शिवाजीनगरात शौचालयाच्या बांधकामांसाठी आयुक्तांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group