जळगाव- खान्देशी पूनरविवाह गृपच्या माध्यमातून दोन जिवाचे घटस्पोट होत असतांना त्यांना समजवून पुन्हा एक करण्यात आले. डॉ. महेंद्र पाटील हे बाम्हणे शिंदखेडा येथील रहिवाशी असून त्यांचा मुलगा बीई इंजीनीअर आहे त्याचा विवाह किशोरदीप चंद पाटील भडगांव हे बँकेत अधीकारी असून त्यांच्या मुलीशी झाला. मुलगी देखील बीएसस्सी झालेली आहे. या दाम्पत्याला तीन वर्षाची मुलगी आहे , तर ह्याच्या सुखी संसारात नातेवाईक विष पररविण्याचे काम केल्याने त्यांच्यातील भांडण गेल्या तर घटस्पोटासाठी वकीला मार्फत तयारी झाली, तसेच तारखा सुरू झाल्यात.
नंतर काहीदिवसांनी डॉ. महेंद्र पाटील हे गृप अॅडमिन भास्करराव पाटील , बापुसाहेब सुमित पाटील यांच्याशी संपर्क केला व त्यांनी संगीतले की मी काही मार्ग काढूका ?आम्ही होकार दिला , व त्यांनी दोघांना व्यवस्थीत समजूत करून विनवण्या करून गृप मधील पूनरविवाहिताचे अनूभव सांगून एक केले. आम्हाला घटस्पोटपासून वाचविले , व तीन वर्षाच्या मुलगीला आई वडीलाचा सहारा दिला व दोघांचा संसार नविन उभा केला , आज आम्ही मंडळी आनंदात आहेत , गैरसमज दूर झाले. यातून समाजाने बोध घ्यावा व भांडण विकोपास न जाता मार्ग काढला तर संसार उभा राहू शकतो व नातेवाईक मंडळी आपला कोणता विचार करतात याचाही बोध घ्यावा.
याचे सर्व श्रेय आम्हा मंडळीना व मराठा खान्देशी पूनरविवाह गृप अॅडमीन भास्करराव नानाजी पाटील (राज्य आदर्श समाजरत्न पूरस्कृत ) बापुसाहेब सुमित पाटील सर कुणबी मराठा वधुवर ग्रुप गौरी उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष वावडदा ता जि जळगाव यांनी मेहनत केली.