Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आता Google Maps दाखवणार गर्दीची लाईव्ह माहिती; जाणून घ्या

आता कुठल्या भागात जास्त गर्दी आहे हे तुम्हाला लाईव्ह पाहता येणार

by Divya Jalgaon Team
November 19, 2020
in तंत्रज्ञान, राज्य
0
आता गुगल मॅप्समध्येही शोधता येणार "आधार' केंद्र

मुंबई : गुगल मॅप्सने अँड्रॉइड आणि आयओएससाठी अनेक नवीन अपडेटची घोषणा केली आहे. तसेच आता सर्व जगभरात हाहाकार माजवलेल्या कोरोना महामारीमुळे गुगल मॅप्सने यासंबंधित एक नवीन अपडेटेड सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. गुगल मॅप्सच्या अपडेटेड व्हर्जनमध्ये आता कुठल्या भागात जास्त गर्दी आहे हे तुम्हाला लाईव्ह पाहता येणार आहे, जेणेकरून तुम्हाला सोशल डिस्टन्सिंग पाळणं सोपं होईल. त्याचबरोबर त्या भागातील कोरोनाग्रस्तांची संख्या, कोरोनासंबंधी मदतीसाठी स्थानिक सेवांचा संपर्क हेही अपवर उपलब्ध असेल.आता Google Maps दाखवणार गर्दीची लाईव्ह माहिती; जाणून घ्या.

कोविड लेअर अपडेटेड गुगल मॅप्स वापरायला सोपं आहे आणि नव्या भागात जाताना ग्राहकांना मदत करणार आहे. कारण की हे फीचर कुठल्या भागात गर्दी आहे याची माहिती आपल्याला आधीच देणार आहे. त्यामुळे आपण त्या भागात जाणे टाळू शकतो. मॅप्सवरील सर्चबारच्या अगदी खाली असलेलं लेअर्स बटण दाबलं की ग्राहकांना COVID-19 Info ऑप्शनला सिलेक्ट करून हे फीचर वापरता येणार आहे.

जगभरातील अँड्रॉइड आणि आयओएस वर गुगल मॅप्सचे युजर्स मोबाइल डेटाचा वापर करून आपल्या आजूबाजूला कुठल्या बस, ट्रेन आणि मेट्रोमध्ये गर्दी आहे किंवा कुठल्या भागात गर्दी आहे याची रियल टाइम माहिती (डाटा उपलब्ध असेल तेव्हा) आता मिळवू शकतात असं कंपनीने म्हटलं आहे. या ऑक्टोबरमध्ये गुगल मॅपने एक नवं फीचर दिलं होतं. मॅपमध्ये राखाडी रंगात तुम्ही COVID-19 कंटेनमेंट झोन दिसत होते. यामुळे अनेकांना याचा खूप फायदा झाला.

याव्यतिरिक्त गुगल असिस्टंट ड्रायविंग मोड हेसुद्धा मॅप्स मध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. हे फीचर फक्त युएसमधील युजर्ससाठी उपलब्ध आहे. कंपनीने हे फीचर भारतात कधी उपलब्ध होणार आहे याबाबत अद्याप माहिती दिलेली नाही. सिस्टंट ड्रायविंग मोड हे युजर्सना त्यांचा स्मार्टफोन कंट्रोल करण्यास तसेच कॉल उचलण्यात किंवा गाणं बदलण्यास गुगल मॅप द्वारे मदत करतो. त्यामुळे युजर्सना गाडी चालवताना कुठलेही अडथळे येत नाहीत. या सर्व नवीन फीचर्समुळे आता गुगल मॅप्सचा वापर करतांना खूप गोष्टी अधिकच सोप्या प्रकारे वापरता येणार आहेत.

अजून वाचा 

दिवाळीनिमित्त फेसबुकने आणले #DiwaliAtHomeChallenge

Share post
Tags: #Android#Google MapsCovid 19COVID-19 InfoDivya Jalgaon NewsiOSMarathi NewsMumbaiMumbai Latest NewsREAL TIMETechnology Newsआता Google Maps दाखवणार गर्दीची लाईव्ह माहिती; जाणून घ्या
Previous Post

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी, सुरक्षा दलांमध्ये चकमक

Next Post

पिंप्राळ्यात बांधकाम मजुराने केली गळफास घेत आत्महत्या

Next Post
अयोध्या नगरमध्ये १९ वर्षीय तरूणीची गळफास घेत आत्महत्या

पिंप्राळ्यात बांधकाम मजुराने केली गळफास घेत आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group