एरंडोल– ‘सेवा परमधर्म’ या ब्रीद नुसार डॉ. फरहाज बोहरी यांनी ऐन दिवाळीच्या तोंडावर एरंडोल येथील एका गरीब कुटुंबाच्या प्रमुखाला योग्य वैद्यकीय उपचार आणि सल्ला देत एका गरीब घरातील दिवा पेटता ठेवला.’सेवा परमधर्म’ मानत डॉ. फरहाज बोहरींनी दिले गरिबास जीवनदान.
एरंडोल येथील रहिवाशी अरुण दगडु नेटके हे बाजारात झाडू व टोपली विकून आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. अरुण दगडु नेटके यांना दि.११ नोव्हेंबर रोजी हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यात त्यांच्या हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या दोन रक्त वाहिन्या ९० टक्के बंद झालेल्या होत्या. याप्रसंगी नेटके यांच्या जीविताला देखील मोठा धोका होता.’सेवा परमधर्म’ मानत डॉ. फरहाज बोहरींनी दिले गरिबास जीवनदान.
या आजारात नेटके यांना खाजगी दवाखान्यात लाखो रुपये लागतील हे डॉ.बोहरी यांना कळले. रुग्ण नेटके यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता त्यांनी वेळीच प्रथमोपचार केले. तसेच अरुण नेटके यांची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना महात्मा फुले आरोग्य योजनेत धुळे येथील डॉ. सुराणा यांच्याकडे जाऊन त्वरित उपचार घेण्याचा सल्ला दिला. यामुळे फक्त तीन दिवसात नेटके भर दिवाळीच्या दिवशी सुखरुप घरी परत आले. यासाठी नेटके परिवारातील सदस्य सुभाष नेटके, संजय नेटके व स्वतः रुग्ण अरुण नेटके यांनी डॉ. फरहाज बोहरी यांना भेटून जीवनदान दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करुन आभार मानले.
शहरातील रुग्णांची सेवा करणारे आरोग्यदुत विक्की खोकरे यांनी यावेळी खुप मोलाचे सहकार्य केले. त्यांनी एरंडोल येथूनच अरुण नेटके यांचे सर्व रिपोर्ट करवून घेतले व महात्मा फुले आरोग्य योजनेत सदर शस्त्रक्रिया होण्यासाठी लागणाऱ्या बाबीं बद्दल तत्काळ माहिती देऊन त्यांची स्वतः पूर्तता करुन सर्वात महत्वाचे कार्य केले.
तसेच धुळे येथील डॉ. सुराणा यांच्या सोबत भ्रमणध्वनीवरुन बोलुन योग्य ती माहिती घेऊन नेटके परिवारातील सदस्यांना योग्य मार्गदर्शन केले. याप्रसंगी विक्की खोकरे यांनी सुद्धा अरुण नेटके यांना मृत्यूच्या दारातून परत आणण्यास मदत केल्याबद्दल नेटके परिवारातील सदस्यांनी त्यांचा शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करुन आभार मानले.
अजून वाचा
जळगावातील कांचन नगर परिसरातील पत्नीच्या मृत्यूने पतीची आत्महत्या