जळगाव – कांचननगर परिसरात पत्नीने विष प्राशन केल्याने तिच्या मृत्यूनंतर पतीने देखील आज सकाळी फेसबुक लाईव्ह करून आपल्या मृत्यूची माहिती देत रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या पाश्र्वभूमीवर सदर मृत तरूणीचे वडिल राजेंद्र वाणी यांनी आरोप केले आहे की, आपली मुलगी कांचन हिने गल्लीतीलच प्रमोद शेटे याच्याशी प्रेमविवाह केला होता.
मात्र तो तिला मारहाण करत होता. याबाबत पोलीसात तक्रार देखील करण्यात आली होती. यानंतर समझोता झाला असला तरी तिला त्रास होतच होता. यामुळे प्रमोद शेटे याने आपल्या मुलीची हत्या करून नंतर त्याने आत्महत्या केली आहे.
कांचन शेटे हिचे वडिल राजेंद्र वाणी यांनी सांगितले की, आपली मुलगी कांचन हिने गल्लीतीलच प्रमोद शेटे याच्याशी प्रेमविवाह केला होता. जावई मयत प्रमोद शेटे हा मुलीस मारहाण करत होता. याबाबत शनिपेठ पोलीस स्थानकात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती.
नंतर मात्र समझोता होऊन ते सोबत राहत होते. या दाम्पत्याला तीन व दीड वर्षाच्या दोन मुली आहेत. त्या आजारी असल्याने काल सायंकाळी डॉक्टरकडे घेऊन जाण्यासाठी कांचनने पैसे मागितले. मात्र प्रमोद शेटे याने पैसे दिले नाही. यानंतर आज सकाळी आपल्या मुलीचा विष प्राशनाने मृत्यू झाला. तर जावयाचे आत्महत्या केली. प्रमोद शेटे यानेच आपल्या मुलीस मारल्याचा आरोप राजेंद्र वाणी यांनी केला.