जळगाव- पियुष नरेंद्र अण्णा पाटील यांनी नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल पी देशमुख यांच्यासह अनधिकृत महाविद्यालय बंद केलेल्या अंदाजे १२०-१३० कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध फिर्याद दिली आहे.
दिनांक १० जुलै २०१९ रोजी नूतन मराठा महाविद्यालयात प्राचार्य डॉक्टर एल. पी. देशमुख यांच्या सांगण्यावरून महाविद्यालयाच्या प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी महाविद्यालयात एकत्र जमून गोंधळ निर्माण केला होता व अनधिकृत महाविद्यालय बंद केले होते.
तसेच आंदोलन चालू असतांना राष्ट्रगीताचा अवमान झाल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी आपण त्यावेळी केली होती. याप्रकरणी दिनांक १७-११- २०२० रोजी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला सुनावणी ठेवण्यात आलेली होती, यावेळी आपण त्या ठिकाणी पुराव्यानिशी जबाब नोंदविला असून फिर्याद देखील दाखल केलेली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला पियुष नरेंद्र अण्णा पाटील यांनी फिर्याद दिली होती.