Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

अक्षय कुमार ठरला सर्वात महागडा अभिनेता

by Divya Jalgaon Team
November 16, 2020
in मनोरंजन, राज्य
0
अक्षय कुमार ठरला सर्वात महागडा अभिनेता

मुंबई –  बॉलीवूडमधील सर्वात व्यस्त कलाकारांच्या यादी खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार अव्वल स्थानी तर  आहे. आगामी दिवसात त्याची सर्वात महागडा अभिनेता अशी गणती होणार आहे. अक्षयने आगामी चित्रपटासाठी घेतलेल्या मानधनाचा आकडा ऐकून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. कारण या चित्रपटासाठी अक्षयने तब्बल 100 कोटी रुपये मानधन घेतले आहे.अक्षय कुमार ठरला सर्वात महागडा अभिनेता.

दिग्दर्शक मुदस्सर अजीज यांचा एक कॉमेडी चित्रपट अक्षयने साईन केल्याची बातमी नुकतीच समोर आली होती. या चित्रपटाची निर्मिती जॅकी व वासू भगनानी करत असून या चित्रपटासाठी अक्षयला तब्बल 100 कोटी मानधन देण्यात आली माहिती समोर येत आहे.अक्षय कुमार ठरला सर्वात महागडा अभिनेता.

‘बेल बॉटम’ या चित्रपटाचे शूटींग सुरु असतानाच या कॉमेडी चित्रपटासाठी अक्षयने होकार दिला होता. 35 ते 40 कोटी रूपये या आगामी चित्रपटाचा प्रॉडक्शन बजेट आहे. पण 150 कोटी रूपयांवर एकूण बजेट पोहोचला आहे. कारण अक्षय कुमारलाच केवळ मानधनापोटी 100 कोटी रूपये देण्यात येणार आहे. अक्षयने केवळ 45 दिवसांत हा चित्रपट पूर्ण केल्यास चित्रपटात संभाव्य तोट्याची शक्यता कमी आहे. त्याचबरोबर सॅटेलाईट, डिजिटल आणि म्युझिक राईट्स विकून चित्रपटावर लागलेले अर्धे पैसे वसूल होतील. बाकीचे अर्धे पैसे थिएटरमधून निघतील. पुढील वर्षी जुलैच्या जवळपास या चित्रपटाचे शूटींग सुरु होईल आणि चित्रपट ऑगस्टच्या अखेरपर्यंत बनून तयार होईल.

अक्षयने काही दिवसांपूर्वीच रंजीत तिवारीचा स्पाई थ्रिलर ‘बेल बॉटम’चे शूटिंग केले आहे आणि सध्या तो यशराज बॅनरचा चित्रपट ‘पृथ्वीराज’मध्ये व्यस्त आहे. अक्षय कुमार पृथ्वीराजनंतर दिग्दर्शक आनंद एल रायचा अतरंगी रे चे शूटिंग करणार आहे आणि त्यानंतर साजिद नाडियादवाला बॅनरखाली निर्मिती होणा-या ‘बच्चन पांडे’च्या शूटिंगला सुरूवात करणार आहे. बच्चन पांडेनंतर तो एकता कपूर निर्मित एका अ‍ॅक्शन कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे.

अजून वाचा 

रानू मंडलला मिळाली आणखी एक संधी

Share post
Tags: Akshay KumarBollywood newsDivya Jalgaon NewsMumbai Bollywood newsMumbai Latest NewsMumbai Marathi newsअक्षय कुमार ठरला सर्वात महागडा अभिनेता
Previous Post

जि. प. जळगावचा डिजिटल बुकचा नाविन्यपूर्ण उपक्रम

Next Post

दिलासादायक ! देशात २४ तासांमध्ये ४३ हजार ८५१ जण करोनामुक्त

Next Post
दिलासादायक ! देशात २४ तासांमध्ये ४३ हजार ८५१ जण करोनामुक्त

दिलासादायक ! देशात २४ तासांमध्ये ४३ हजार ८५१ जण करोनामुक्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group